44+
वर्ष अखंड
कार्यरत
लोक उत्कर्ष समिती
राष्ट्राय स्वाहा! राष्ट्राय इदं न मम!
हे ब्रीद घेऊन लोक उत्कर्ष समिती गेली ४४ वर्षे अखंड कार्यरत आहे.
आमच्या कार्याचा पाया सेवा, संस्कार आणि समरसता या त्रिसूत्री मूल्यांवर आधारित असून, ट्रस्ट शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या क्षेत्रांमध्ये कार्य करते.
समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पीडित, अपंग, वृद्ध आणि वंचित घटकांच्या उत्कर्षासाठी कार्य करणे हा ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार शिक्षण व वैद्यकीय सहाय्य, उद्योग व रोजगार मार्गदर्शन, सेंद्रिय शेती व जलसंवर्धनाचे मार्गदर्शन, तसेच ग्रामविकास आणि सांस्कृतिक प्रबोधन अशा विविध माध्यमांतून सर्वांगीण सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न ट्रस्टद्वारे सातत्याने केला जातो.
लोक उत्कर्ष समिती हा ट्रस्ट आयकर नियम ८०-जी अंतर्गत सवलतीस पात्र आहे.
For the past 44 years, Lok Utkarsh Samiti has been dedicated to bringing about meaningful change in society, guided by the timeless ideals of service, sanskar (cultural values), and harmony. The trust is committed to creating a more inclusive and empowered society through focused efforts in education, healthcare, and self-reliance. The primary objective of our trust is to uplift economically weaker, oppressed, differently-abled, elderly, and marginalized communities. To achieve this, we work towards comprehensive social development by providing educational and medical support, offering employment guidance, upgrading small-scale industries, providing guidance on organic farming & water conservation, along with fostering rural development and cultural awareness. All our efforts are directed towards nurturing a self-reliant, compassionate, and ethically grounded society.
Lok Utkarsh Samiti is a registered charitable trust, and all donations made to it are eligible for tax exemption under Section 80G of the Income Tax Act.
Projects
दरवर्षी १४ ऑगस्ट (अखंड भारत संकल्प दिन) रोजी अखंड भारत करण्याचा संकल्प केला जातो, व यानिमित्त कोल्हापूरमध्ये विविध भागांत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते.
Know More
लघु व्यावसायिकांच्या प्रगतीसाठी व त्यांना व्यवसायातील विविध पैलूंविषयी मार्गदर्शन करण्यासाठी लोक उत्कर्ष समितीने दरमहा विशेष प्रशिक्षण उपक्रम सुरू केला आहे.
Know More